Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

बस- ट्रकची समोरासमोर जोरदार धडक #accident

मुल:- मूल वरुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या बस आणि चंद्रपूर वरून मूल कडे येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची घटना मूल - चंद्रपूर मार्गावर (ता. 4 जुर्ले) रोजी 5 वाजता दरम्यान घडली.
परिवहन महामंडळाची बस क्रं. एम एच 40 एक्यु 744 ही मूल बस स्थानकावरुन चंद्रपूरकडे जात होती तर चंद्रपूर वरून ट्रक क्रं. सी जी 04 आय एफ 6255 मूलकडे येत होता, दरम्यान बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार बस चालकाचे दोन्हीही पायाला गंभीर जखम झाली असून, रुग्णवाहिकेने तातडीने त्यांना चंद्रपूरला हलविले आहे. अन्य प्रवाशांना किरकोळ जखमा झाले आहे. बस चालकांनी विरुद्ध दिशेने जाऊन ट्रकला ठोस मारल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन जखमीना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविले, पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत