Top News

सलग तिसऱ्या दिवशी युवा मोर्चाच्या वतीने मदत कार्य सुरू #ballarpur


जिथे प्रशासन कमी तिथे आम्ही हे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे वाक्य प्रत्येक कार्यकर्ता अमलात आणणार:- आशिष देवतळे
बल्लारपूर:- शहरात सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे लोकनेते लोकलेखा समिती अध्यक्ष मान.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात पुराचे पाणी उतरल्या नंतर देखील प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने बल्लारपूर शहरात अतिवृष्टीमुळे व पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली. यामध्ये गणपती वार्ड, सिद्धार्थ वार्ड, किल्ला वार्ड, गांधी वार्ड तसेच मौलाना आझाद वार्डामध्ये देखील अनेक घरांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे आढळले असता नुकसान झालेल्या घरांची नोंद करण्यात आली.

बल्लारपूर शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या मागे शांतीनगर वस्ती मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे लक्षात येतात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी तिथे त्वरित धाव घेऊन बल्लारपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी श्री.काटकर साहेब यांच्याशी फोनवर संपर्क करून टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच गणपती वार्डात हॅन्ड पंप बोरिंग बंद असल्याचे कळताच बल्लारपूर नगरपालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी श्री.खामणकर साहेब यांच्याशी फोनवर संपर्क करून बंद असलेल्या बोरिंगची दुरुस्ती करून नागरिकांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.

यावेळी प्रसार माध्यमांची बोलताना श्री.आशिष देवतळे यांनी सांगितले की जोपर्यंत बल्लारपूर शहरातील नागरिकांच्या घराच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे होत नाही व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर होत नाही तोपर्यंत भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेच्या हाकेला धावून जाईल आणि मदतीचा हात देईल अशी प्रतिक्रिया यावेळी दिली. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते तेजिंदर सिंग दारी, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मोहित डंगोरे,युवा नेते गणेश कुंडे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने