Top News

युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू #Rajura #death


-गोवरी कॉलनी येथील युवकाचा नाल्यात आढळला मृतदेह


राजुरा:- शनिवारी दुपारी चार वाजता च्या सुमारास गोवरी कॉलनी येथील एका युवकाची दुचाकी क्रमांक एम.एच.34 बि.के. 8442 आणि कपडे गोवरी जवळील नाल्याजवळ आढळून आले. प्रीतम गुरुदास आवारी वय 24 वर्ष रा. गोवरी कॉलनी असे मृतकाचे नाव असून हा युवक पोहायला आला होता.
याबाबतची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी एपीआय साखरे व अन्य पोलिस कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला मात्र गोवरी नाल्यात तुडुंब पाणी असल्यामुळे त्याचा शोध लावण्यात अडथळा निर्माण होत होता.
आज दि.17 जुलै ला पहाटे नाल्यातून पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या मागे आई-वडील व तीन बहिणी असून प्रीतम आवारी यांचे वडील वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात चालक म्हणून कार्यरत आहेत. आई नुकतीच तीर्थयात्रेला गेली असल्याने हा तरुण आपल्या लहान बहिणी आणि वडिलांसोबत घरी होता. पण दि. 16 जुलै रोजी दुपारी पावणेचार वाजता च्या सुमारास प्रीतम मोटर सायकल वरून गोवरी नाल्याकडे गेला अशी माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेतला असता प्रीतम चा मृतदेह याच नाल्यात आढळून आला. प्रितम च्या अश्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय पी. आर.साखरे व राजुरा पोलिस करीत आहे.
---------------------------------------------

मुलांनो सावधान..... पालकांनो जागरूक रहा........

पावसाळा आला की नदी नाले तुडुंब भरून वाहत असतात. अशातच हौशी व अप्रशिक्षित तरुणांना पाण्यात पोहन्याचा मोह आवरत नाही. काही विध्यार्थी, तरुण घरी न सांगता अशा पुराच्या पाण्यात पोहायला जातात. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे व विशेष पोहण्याचं प्रशिक्षण नसल्यामुळे या हौशी विद्यार्थी व युवकांना पाण्यात पोहणे महागाचे पडत आहे. समाज माध्यम, वृत्तपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा अशा घटनांमुळे विद्यार्थी व युवकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या वार्ता ऐकून व बघूनही विनाकारण जीव धोक्यात घालू नये. मुलांनी सतर्क राहून पालकांनीही आता जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. अशी प्रतिक्रिया बादल बेले यांनी दिली आहे.

*बादल एन. बेले*
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने