सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याच्या मदतीला भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली धाव #ballarpurसर्पदंशाच्या घटना घडल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता नागरिकांनी त्वरित रुग्णालयात धाव घ्यावी:- आशिष देवतळे
बल्लारपूर:- बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावामध्ये कुसुमताई कवडू वाढई या शेतामध्ये काम करत असताना अचानक त्यांना सर्पदंश झाला असल्याचे कळताच तिथे कामकरणाऱ्या इतर लोकांनी या घटनेची माहिती कोठारीचे सरपंच श्री.मोरेश्वर लोहे यांना दिली तसेच त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णाला बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आणि या घटनेची माहिती सरपंचांनी त्वरित नेहमी सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांना दिली.
तेव्हा वेळ न गमावता आशिष देवतळे यांनी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर श्री.गजानन मेश्राम यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला व स्वतः रुग्णालयावर धाव घेतली व पेशंट रुग्णालयात दाखल होतात त्वरित इलाज सुरू केला तसेच काही वेळानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाला ॲम्बुलन्सची व्यवस्था करून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आणि चंद्रपूरच्या डॉक्टरांशी फोनवर संपर्क साधला आणि रुग्णाचा त्वरित इलाज करा करण्याचे सांगितले याप्रसंगी रुग्णांच्या सोबत आलेल्या नातेवाईक, गावकरी तसेच उपस्थित इतर नागरिमध्ये भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी त्वरित धाव घेऊन केलेल्या जणसेवेच्या कार्याची सर्वत्र चर्चा झाली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मोहित डंगोरे आणि भाजपाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत