Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

अबे पोट्टेहो आज येत आहात न राजीव गांधी सभागृहात! chandrapur

कराळे मास्तरांच्या खास शैलीतून चंद्रपुरात करिअर मार्गदर्शन शिबीर

यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन


चंद्रपूर:- आज रविवारी सायंकाळी 5 वाजता राजीव गांधी सभागृह येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन फिनिक्स अकॅडमीचे संचालक नितेश कराळे सर हे या शिबिरात विद्यार्थ्यांना मागर्दशन करणार आहे. तर आमदार किशोर जोरगेवार यांची या शिबिराला प्रामुख्यतेने उपस्थिती राहणार आहे.
10 वी आणि 12 विची परिक्षा उत्तिर्ण झाल्यावर पूढे काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमी पडत असतो. अशात योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळावे या करिता यंग चांदा ब्रीगेडच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज रविवारी राजीव गांधी सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता सदर शिबिराला सुरुवात होणार आहे. फिनिक्स अकॅडमीचे संचालक नितेश कराळे सर या शिबिरात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी जवळपास 1500 विद्यार्थ्यांनी आँनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. तसेच ईच्छुक विद्यार्थ्यांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जैन भवन जवळील कार्यालयातही पासेस उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनाही मोठ्या संख्येने या करिअर मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसह येणा-या पालकांच्या बसण्याचीही या शिबिरात विशेष व्यवस्था करण्यात आली असुन पालकांनीही या शिबिरात येण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत