Top News

स्वर प्रिती कला अकादमी राजुरा तर्फे गुरू पौर्णिमा साजरी. #Chandrapur #Rajura

पहिली गुरु आपली आई:- अल्का सदावर्ते.

राजुरा:- स्वर प्रिती कला अकादमी राजुराच्या वतीने गुरुपौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. सुगम संगीत शिकणारे स्वर प्रिती च्या विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व तुळशी रोपांचे पूजन करून "वंदे मातरम" गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर प्रिती चे अध्यक्ष दिलीप सदावर्ते, कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका व संयोजिका अल्का सदावर्ते यांनी स्थान भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून बादल बेले,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो, स्वतंत्रकुमार शुक्ला, सुषमा शुक्ला,जेसीआय, मोहनदास मेश्राम, नक्कावार यांची उपस्थिती होती.
अल्का सदावर्ते यांच्या मार्गदर्शनात सुगम संगीत शिकणाऱ्या शिष्यानी रागांवर आधारित गीत व प्रार्थना गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बादल बेले यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वर प्रितीच्या उपक्रमाची प्रशंसा केली.
त्याचे गुरू श्री सदावर्ते व सौ.सदावर्ते यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
प्रस्तावनेत अल्का सदावर्ते यांनी स्वर प्रिती चे उपक्रम व सुगम संगीत या बद्दल माहिती दिली व गुरू प्रार्थनेचे गायन केले. या प्रसंगी श्री स्वतंत्र कुमार शुक्ला, सुषमा शुक्ला, श्री मोहनदास मेश्राम,श्री रत्नाकर नाक्कावार,लिना प्रतापवार, वैशाली येगीनवार, सुनीता कुंभारे,नंदिनी देशमुख, लता ठाकरे, सूनयना तांबेकर, लता कुळमेथे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून "संगीत हे मनाचे औषध आहे, ते जितके जास्त घेणार तितके लाभदायक ठरते" असा संदेश दिलीप सदावर्ते यांनी दिला. कार्यक्रमचे संचालन राजश्री उपग्नलावार यांनी केले व आभार वैशाली येगीनवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रचना उपगनलावार, वरदा देशकर, स्वरा मारोटकर, साहस इंगळे, पेरी विरमलवार, स्वरूपा झंवर, विणा देशकर, प्रतिभा भावे, वनमाला परसुटकर, अंजली गुंडावार, वर्षा वैद्य यांनी सहकार्य केले. "तन मन धन से " या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने