अतीवृष्टी मुळे माजरी परीसरातील जनजीवन विस्कळीत #bhadrawati

Bhairav Diwase


भद्रावती:- तालुक्यात सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विसकळीत झाले असुन सर्वत्र पूर परस्थितीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील माजरी परीसरात शिरना नाल्याला पुराचे पाणी वाढल्याने माजरी, पळसगाव, चालबर्डी, कोंढा या गावाचा वणी, वरोरा, भद्रावती या शहराशी संपर्क तुटला असुन सर्व येण्या - जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
 माजरी वे. को. लि. ने नागलोन खुल्या खाणीतुन निघणाऱ्या ओबीचे ढीगारे शिरना नाल्याच्या काठा लगत टाकले असल्या मुळे शिरना नदीला येणाऱ्या पुराचे पाणी हे माजरी, पळसगाव या गावात घुसण्याची दाट शक्यता आहे. 
या पुराच्या पाण्यामुळे या परीसरातील शेतातील कापूस, सोयाबीन पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वे. को. लि. ने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.