Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

बगुलवाईच्या कोलाम गुड्यावर उगवली वृक्षारोपणाची पहिली पहाट!

ठाणेदार राहुल चव्हाण यांचा पुढाकार

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी कृषी दिनानिमित्ताने 1 जुलै 2022 ला बघुलवाईच्या कोलाम गुड्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण व व्यापारी असोसिएशन विरूर यांच्या पुढाकारातून तेथील कोलाम बांधवांना नवसंजीवनी व एक उद्योग म्हणून प्रत्येकी कुटुंबात एक फळाचे व एक वृक्ष देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत विरूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

स्वातंत्र्य च्या पासून मूलभूत सुविधेपासून वंचित असलेल्या आदिवासीबहुल असलेल्या कोस्टाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राज्याच्या शेवटच्या टोकावर राजुरा तालुक्यातील  तेलंगणा महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बगुल वाई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या पुढाकारातून व्यापारी असोशियन विरुर यांच्या अथक परिश्रमातून बघुलवाई येथील हनुमान मंदिराची पूजा अर्चना करून व कोलाम बांधवांच्या आदिवासी नृत्यातून वृक्षारोपण व सत्कार सोहळा पार पडला.

 कार्यक्रमाला उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, यांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या या वृक्षामुळे निसर्गसुंदर होऊन जातो निसर्गात असलेल्या विविध झाडामुळे आपला निसर्ग हिरवागार सुद्धा दिसतो वृक्षाचा मानवाला होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे ऑक्सिजन होय, असलेली झाडे हीआपल्याला अन्न, वस्त्र, फळे, फुले, पाने, आयुर्वेदामध्ये उपचार म्हणून अनेक झाडाचा वापर केला जातो. तसेच पर्यावरणातील काही झाडापासून रबर आणि विविध प्रकारचे इंधन सुद्धा प्राप्त होते आपल्या सभोवतालचे अनेक लहान पक्षी या झाडांच्या आधारे आपले घर बांधतात व विसावा घेतात आपण जर वृक्षारोपण केले वृक्ष वृक्षाचे योग्य पालनपोषण केले तर त्यापासून आपल्याला विविध गोष्टी प्राप्त होतात असे प्रतिपादन उपस्थित कोलाम बांधव व मान्यवरांना केले.
 
येथील प्रतिष्ठित व्यापारी सतीश कोमरवेल्लीवार, सुरेंद्र पाल सिंग बावेजा, तंटामुक्ती अध्यक्ष राजु ईग्रपवार, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कुळमेथे, अजित सिंग टाँक, बीमरावं पाला,रविंदर सिंग  टाँक, सेवानिवृत्त वनपाल विलास आक्केवार, अजय रेड्डी,आदिवासी नेते वाघुजी गेडाम, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत