ज्यांनी विदर्भाच्या विकासाकरिता योगदान दिले त्यांचेच नाव वृत्तपञाच्या यादीतून गायब #chandrapur

Bhairav Diwase
0

'आत्तापर्यंतचे मुख्यमंञी' या विधीमंडळ विशेष पुरवणीत मा. सा कन्नमवारांचे छायाचिञ व नाव गायब

महेश कोलावारांनी व्यक्त केली खंत

चंद्रपूर:- ज्यांनी विदर्भाच्या विकासाकरिता योगदान दिले त्यांचेच नाव वृत्तपञाच्या यादीत गायब असल्याची खंत भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी पुढे बोलतांना कोलावार म्हणाले की मा. सा कन्नमवार हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे १९६२ सालच्या भारत-चीन युद्धानंतर संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यांनी जातांना विदर्भातले नेते मारोतराव कन्नमवार यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. परंतु दुर्दैवाने १९६३ साली त्यांचे आकस्मिक निधन झाले.
मा. सा कन्नमवार यांनी आपल्या अल्पशा कारकिर्दीत का असेना अनेक संरक्षण प्रकल्प महाराष्ट्रात आणले. ओझरचा मिग विमान कारखाना, वरणगाव, भंडारा व भद्रावती येथील संरक्षण साहित्य उत्पादनाचे कारखाने त्यांच्या अचूक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात आले.
घरोघरी वृत्तपञे विकणारा, रेल्वे स्टेशनवर टिकीट तपासनीस म्हणून काम करणारा, चंद्रपूर जिल्ह्यासारख्या अतिदुर्गम भागातून आलेला एक सामान्य माणूस आपल्या इच्छाशक्ती व कठोर परीश्रमाच्या बळावर महाराष्ट्राचा मुख्यमंञी होतो. अश्याप्रकारे अनेक कार्य मा.सा कन्नमवारांनी करुन स्वता:ची एक अमीट छाप निर्माण केली. एकूणच त्यांची राजकीय कारकिर्द पण महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवून गेली.
अश्या नेत्याचा वृत्तपञाच्या पुरवणीतून छायाचिञ व नाव गायब होतो ही बाब चंद्रपूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर विदर्भ वासियांसाठी खूप मोठी खंत असल्याची भावना महेश कोलावारांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)