ए. जी कंन्ट्रक्शन कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघातात वाढ #chandrapur #gondpipari


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
गोंडपिपरी:- गोंडपिपरी-आष्टी महामार्गावर भंगाराम तळोधी फाट्यावर एम एच ३४ बी. डी. ७७७७ व एम एच ३३ टी २६९२ दोन ट्रकची एकमेकांना समोरासमोर धडक बसली.
नुकतंच २ जुलैला सकाळी ९ वाजता एजी कन्ट्रक्शन कंपनी च्या साईडवरच्या ऑफिस समोर एक गंभीर घटना घडली. अहेरी कडून नागपूरला जाणारी बस क्रमाका एम. एच. ४० ए क्यू ६३९५ व समोरून येणारा मालवाहू ट्रक कमाक एम. एच. ३४ बीड ९२५२ या दोन वाहनाचा समोरासमीर अपघात झाला.
सद्यस्थितीत नवेगाव ते आष्टी रोडचे बांधकाम सुरू असल्याने रस्ता दुभाजक नावामुळे सोबतच दिशा दर्शक फलक काम सुरु असणाऱ्या ठिकाणी नसल्याने अपघात मोठया प्रमाणात होत आहे. सदर कामात कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे रोज अशाप्रकारचे अनेक अपघात आहे. मात्र संबंधित विभाग या कडे दुर्लक्ष करीत आहे. अपघातात अनेकाना अपंगत्व येत आहे वाहनांचे फारमोठे नुकसान होत आहे.
रोज गोडपिपरी आष्टी मार्गावरील वाहतूक दोन ते तीन तासासाठी ठप्प होत आहे. प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सरपंच अंकुर मल्लेलवार व ग्रामस्थांनी निवेदन दिली आहे व त्यातून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत