मुलाला नवं 'जिवन' देण्यास वडील बनला 'दास' #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

सोशल माध्यमातून आर्थिक सहकार्याची करतोय विनवणी

अनेक मदतगारांकडून आशिर्वादासह मिळतेय मदत


चंद्रपूर:- जिल्ह्यातील आदिवासी व मागास तालुका म्हणून ओळख असणारे पोंभूर्णा तालुक्यातील शेवटचे टोक म्हणजे जुनगाव. अशा ग्रामीण भागात राहुन गेली पंचवीस-तिस वर्षांपासून गरिबीचे चटके खात संसाराचा गाडा हाकत पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करुन परखड लिखाण करणाऱ्या वडिलावर मुलगा 'हिमालय' वर आलेल्या संकटाने खोल दरीत अडकून पडल्याचे वास्तव जिवनदास गेडाम यांचेवर मुलगा 'हिमालय' यांच्या चिंताजनक प्रकृतीने निर्माण झाले आहे.
ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या 'हिमालय' ने बापाला मदत होईल म्हणून गरिबीची चिड निर्माण करीत मिळेल ते काम करुन घरी मदत करणाऱ्या 'हिमालय' वर काळाने दृष्ट डाव रचत काळाचा घाला घालून 'हिमालय' च्या मेंदूला लकवा मारला व 'हिमालय' जागीच कोसळून निशब्द झाला. ह्यात वडील जिवनदास यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकली की काय ? अशा प्रश्नात 'हिमालय' चा जिव वाचविण्यासाठी वडिलांनी टाहो फोडला. व अनेकांच्या मदतीने 'हिमालय' ला घेऊन उपचाराकरिता चंद्रपुर सामान्य रुग्णालय गाठले. तिथेही डाक्टरांनी हात झिडकारले. पण मुलाला वाचविण्यासाठी आपले जिवन पणाला लाऊन खासगी रुग्णालयात दाखल केले. पण तिथेही डाक्टरांनी हात वर करीत लाखो रुपयाचा खर्च येणार तुम्ही तो पुर्ण करु शकणार नाही आणी 'हिमालय' च्या प्रकृतीबाबत काहीच सांगता येणार नाही म्हणून तुम्ही सावंगी मेघे रूग्णालयात घेऊन जा असा सल्ला खासगी रुग्णालय डाक्टरांनी दिला. हा सल्ला ऐकताच जणू हिमालय च्या खोल दरीत कोसळल्यागत जिवनदास चा धिरही कोसळून पडला.
वडील जिवनदास च्या खिशात फुटकी दमडीही नव्हती. काय करावे काय नाही या चिंतेने चिंताग्रस्त असलेल्या वडील जिवनदास ने मदतीची हाक मारत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मोठी मदत तात्काळ पाठवली. आणि ताबडतोब सावंगी मेघे रूग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. अशा अनेकांकडून मदत व्हावी म्हणून जुनगाव येथील उपसरपंच राहुल पाल यांनी पुढाकार घेऊन सोशल माध्यमातून हाक देऊन अनेकांना आवाहन केले व स्वतःही मोठी मदत दिली.
गेल्या हप्ताभरापासून 'हिमालय' हा सावंगी मेघे रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. हप्ता भरापासून उपचाराकरिता मोठा खर्च येत असल्याने पुन्हा एकदा हिमालय च्या वडिलांनी सोशल माध्यमातून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मदतगारांच्या आशिर्वादासह आर्थिक मदतीने 'हिमालय' च्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे.
परंतु अशा बिकट परिस्थितीत घरी अठराविश्व दारिद्र्य असतांना ह्यात मुलगा हिमालय ला एवढ्या गंभीर आजाराने ग्रासल्याने मोठी चिंताग्रस्त परिस्थिती जिवनदास गेडाम यांचेवर आल्याने मुलाचे जिवन वाचविण्यासाठी जणू जिवनाचा दास च बनल्या ची परिस्थिती सध्या जिवनदास गेडाम यांचेवर येऊन ठेपली आहे. जिवनदास गेडाम यांच्या मुलावर ओढवलेल्या या मोठ्या संकटातून बाहेर काढण्याकरिता आपल्या आशिर्वादासह व आर्थिक मदती विना शक्य नाही. अशा खचलेल्या मनातून जिवनदास यांनी मदतगारांचे आभार मानत पुन्हा मदतीची मागणी केली आहे. या वृत्ताच्या माध्यमातून मुलाकरिता वडिलावर कोसळलेल्या संकट समयी मदत व्हावी म्हणून मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्यांना कुणाला आर्थिक मदत द्यायची आहे. त्यानी जिवनदास गेडाम यांच्या 8459402225 या गुगल पे व फोन पे नंबर वर पाठवून मदतगार होऊ शकता. बस इतकीच अपेक्षा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)