अंधाराच्या फायदा घेत महिलेवर अतिप्रसंग #chandrapur #sindewahi

Bhairav Diwase
0

सिंदेवाही:- पिडीता ही विवाहित असून तिच्या सासरा व आरोपीच्या वडील यांच्यामध्ये घराकडे जाण्याच्या रस्त्यावरून वाद असून तो सदर जागेबाबत कोर्ट केस चालू आहे सदर केस ची माहिती देण्याकरीता आरोपी पीडित महिलेला भेटला, कोर्टामध्ये केस चालू आहे त्याबद्दल मला बोलायचे आहे.
पीडित महिला 2/7/2022 ला शनिवारी रात्रौ ११ वाजता च्या दरम्यान त्याला भेटायला गेले असता विचारले की कशाबद्दल बोलायचे आहे सांगा असे पीडिततेने म्हटल्यावर त्यावर आरोपीने अंधाराच्या फायदा घेत तीला जवळ बोलावले व अतिप्रसंग केला.
 पिडीतेने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे 3/7/2022 रविवारी रिपोर्ट दिली. त्यावरून पोलिसांनी अप. क्रमांक 182/2022 नोंद करीत कलम 376 (१)(ए) 376(२)(f ) 354(१)(ए) 323 भारतीय दंड विधाना प्रमाणे गुन्हा नोंद केला असून आरोपीला तात्काळ अटक केले व आरोपी ची वैद्यकीय तपासणी करून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. याचा पुढील तपास पीएसआय ठाकरे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)