चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी वाय प्लस (Y+) सुरक्षा काढण्याची केली मागणी

चंद्रपूर:- चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली 'वाय प्लस' (Y+) सुरक्षा काढून घेण्याबाबत पत्र दिले आहे.
राज्यातील ताजा राजकीय पेचप्रसंग बघता शिवसेनेच्या शिंदे गट आणि समर्थक अपक्ष आमदार यांना वाय प्लस सुरक्षा कवच दिले गेले होते. यशस्वी सत्ता स्थापनेनंतर आ. किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात दाखल होताच चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून ही सुरक्षा काढून घेण्याची मागणी केली आहे.
आ. जोरगेवार यांचे निवासस्थान आणि कार्यालय येथे गृह विभागाने शस्त्रधारी अतिरिक्त सुरक्षा पुरविली होती. मात्र ज्या महाविकास आघाडीतून आपण बाहेर पडलो, त्या सर्व स्थानिक नेत्यांना आपण नव्या बदलाबाबत कल्पना दिली होती, असे सांगत मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेसोबत राहण्याची गरज असल्याचे पटवून दिल्याचे ते म्हणाले. आपल्याला याची गरज नाही, असे सांगत सुरक्षा कमी करण्याची मागणी आ. जोरगेवार यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत