Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

वनपरिक्षेत्र अधिकारी व चिंचोली वनरक्षक यांच्या तत्परतेने जखमी चितळाचे वाचले प्राण #chandrapur #rajura


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा

राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत विरूर स्टेशन परिसरातील चिंचोली गावा मध्ये दि. ६ जुलैला बुधवारला सकाळच्या सुमारास बकऱ्या चरण्याकरिता चिंचोली जंगल लगत गेले. बकऱ्या चरुन झाल्यावरती चिंचोली गावात येत असता वेळी बकऱ्या सोबत एक चितळ पण त्यांच्या मागे मागे गाव पर्यंत पोहचला होता आणि गावाचे मोकाट कुत्र्यानी चितळ वरती हमाला केला असता चितळ जखमी झाला. त्या वेळी वनमजूर चिंचोली येथे असल्यामुळे चितळ चे प्राण वाचले.

 लगेच वनमजूरांनी चिंचोली वनरक्षक राठोड याना माहिती दिली असता राठोड व वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एम. पवार साहेब यांना माहिती देऊन ताबडतोब वन कर्मचारी व अधिकारी मोक्या वरती पोहचून चितळ ला राजुरा येथील दवाखाने मध्ये नेऊन उपचार करण्यात आला व त्या नंतर चितळ ला उपचार करून सुख रूप कविट पेट जंगल क्रमांक 137/138 कंपार्टमेंट मध्ये सोडण्यात आले व राजुरा चे उप विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शना नुसार एका प्राण्यांचे जीव वाचण्यात आले तर मोक्या वरती विरूर रेंज चे. वन परिक्षेत्र अधिकारी डी. एम पोवार साहेब यांच्या उपस्थित कर्मचारी गोविंद वार साहेब चिंचोली वन रक्षक जी. व्ही.राठोड साहेब. ए. व्हीं.मस्तान साहेब वन रक्षक.कू.अंगलवार.म्याडम वन रक्षक यांच्य सहाय्याने चितळ चे प्राण वाचव न्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत