ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष
कोरपना:- तालुक्यातील वडगाव येथील नालीची दुरावस्था झाली तरी सुद्धा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन या कडे दुर्लक्ष करत आहे. पावसाळा लागूनही नालीची अजून पर्यंत स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे नाली पूर्णपणे कचऱ्याने भरलेली असून पाणी पूर्णपणे रस्तावर येत आहे त्यामुळे गावामध्ये रोगराईची शक्यता नाकारता येत नाही.
रस्ताने नालीच पाणी साचून रस्त्यावर येत असल्यामुळे गाडी सुद्धा घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाली पूर्णपणे स्वच्छ करून रस्त्यावर येणार पाणी तात्काळ थांबविण्यात यावं अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते प्रकाश शेडमाके आणि गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली.
निवडणुका आल्यावर विकासाची पोकळ आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत आहे. गावाला विकासाच्या वाट्यावर आणू, गावाला विकासाच्या प्रगतीपथावर नेऊ असे सांगणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गेले? असा सवालही शेडमाके यांनी गावातील राजकीय कार्यकर्त्यांना केला.