Top News

घुग्घुस शहरात काँग्रेसला खिंडार #chandrapur #bjpchandrapur

कामगार नेते सचिन कोंडावर यांच्या नेतृत्वात २५ कामगार बांधवांचा भाजपात प्रवेश


चंद्रपूर:- घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्थानिक कामगार नेते सचिन कोंडावार यांच्या नेतृत्वात शहरातील २५ कामगार बांधवांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला.
    याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी त्यांच्या व सहकाऱ्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून सर्वांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या तसेच कामगार नेते सचिन कोंडावार यांना भाजपा कामगार आघाडी, घुग्घुस शहराच्या कार्याध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. 
   भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजप परीवारातील प्रत्येक कार्यकर्ता हा जनसेवेसाठी तत्पर असतो. शहरातील २५ नव्या कार्यकर्त्यांचे पक्षात येण्याने निश्चितच पक्षाची स्थानिक पातळीवर ताकद वाढली आहे. यापुढील काळात घुग्घुस शहरात भारतीय जनता पार्टीचा विचार तसेच लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची विकासकामे, सेवा उपक्रम शहरातील जनमानसापर्यंत अधिक जोमाने पोहचविण्यासाठी हे सर्व मंडळी अविरत काम करतील. याचा मला विश्वास आहे असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यावेळी बोलताना केले. 
प्रवेश करणार्‍यांमध्ये, प्रणय लिंगमपेल्ली, प्रेमराज कालापेल्ली, सुधीर कनकम, योगेश आरापेल्ली, कुमार अंबाला, मंगेश पचारे, विनोद आगदारी, कमलेश पुटकमवार, माधव मांढरे, आशिष कालीया, गोलू मोहुर्ले, मंगल छुरा, अमित यादव, संदीप जुनारकर, अशोक सोनटक्के, रंजीत तरारे, विशाल कोंडावार, राजम कुम्मरवार, बासमपेल्ली पोचम, बाबा जिवने, कमलेश पुटकमवार, अभिराम चड्डाल, अमित चड्डाल, बनी अवनोरी आणि रत्नदीप कोंडावार यांचा समावेश आहे.
  मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वातील केंद्र सरकारने कामगारांचे हित लक्षात घेऊन आखलेल्या विविध योजना तसेच गोरगरीब, कष्टकरी कामगार वर्गाच्या हाकेला ओ देत *आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या माध्यमातून भाजपने वेळोवेळी केलेल्या मदत व सहकार्यामुळे आम्ही पक्षात प्रवेश करीत आहोत असे मत यावेळी नवनियुक्त भाजपा कामगार आघाडी, घुग्घुस शहराचे कार्याध्यक्ष सचिन कोंडावार यांनी व्यक्त केले.
   कामगार बांधवांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांचे खंदेसमर्थक म्हणून कामगार नेते सचिन कोंडावार यांची ओळख होती. काही महिन्यापूर्वी कोटनका कंपनीत काम करणाऱ्या कामगार बांधवांनी आपल्या विविध मागण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन केले होते. परंतु या आंदोलनाचा फज्जा उडाल्याने कामगार बांधवांनी भाजपात प्रवेश केला.
   यावेळी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस सभापती निरिक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, भाजपाचे राजकुमार गोडसेलवार, सिनू इसारप, साजन गोहने, वैशाली ढवस, पूजा दुर्गम, रत्नेश सिंग, बबलू सातपुते, संजय भोंगळे, प्रवीण सोदारी, गुड्डू तिवारी, विनोद जंजर्ला, निरंजन डंभारे, तुळशिदास ढवस,  सुरेंद्र भोंगळे, विक्की सारसर, किशोर घनकसार, धनराज पारखी, हेमंत कुमार, मूर्ती पेरपुल्ला, प्रज्ज्वल अंड्रस्कर, कोमल ठाकरे यांचेसह आदि मंडळी आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने