Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पावसामुळे जैरामपुर ते येनापुर रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल #chandrapur #gadchiroli #Chamorshi


प्रशासनाने लक्ष देण्याची गरज, ग्रामपंचायत मुधोली तुकुम उपसरपंच दिलीप वर्धलवार यांची मागणी

 (आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी

चामोर्शी:- मागील कित्येक वर्षापासून येनापुर ते जयरामपूर मार्गाची व्यवस्था ही खूप बिकट झाली असून सदर रस्त्याने ये जा करणाने लोक हे आपला जीव मुटित टाकून प्रवास करत आहेत.
सदर रस्त्यावर जागच्या जागी खड्डे पडल्याने सदर मार्गाने जाण्याकरिता प्रवासी कानाडोळा करीत असून सदर मार्ग सोडून लोक 20 ते 25 की.मी अंतरावरून जयरामुर गणपुर ते सेलुर ते येणपुर असा अधिक लांबीचा प्रवास करीत आहेत परंतु येवढे असून सुद्या सदर मार्गाने खाजगी वाहनाने शुल्लक हे 50 ते 60 रुपये घेत असल्याने सदर मार्ग हे सर्वसाधारण गरीब जनतेस परवडणारे नाही.
येनापुर हे गाव मुख्य मार्गावर असल्याने जैरामपूर मुधोली लक्ष्मणपूर येथील लोक हे बँक बजाराकरिता येनापुर ला येत असतात परंतु सदर मार्ग पूर्णतः रखडलं असल्यामुळे सदर गावातील जनतेस व शाळकरी मला मुलींना खूप त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे सदर मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायत मुधोली तुकुम येथील उपसरपंच श्री - दिलीप वर्धलवार यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत