(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील येणाऱ्या विरूर स्टेशन परिसरलगतच्या कविटपेट येथील शेतकरी अमित अनिल मोरे यांनी आज विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
अमित अनिल मोरे यांच्याकडील 7 एकर शेती पाण्याच्या पुर आल्यामुळे शेती संपुर्णपणे नष्ट झाली. त्यामुळे अमित मोरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली 15 ते 20 दिवसा पासून सतत पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने सर्व शेत जमीन पाण्याने भरलेले आहे. शेतातील पीक संपूर्णपणे नष्ट झाली आहे.
अमित मोरे यांची शेत नदी नाल्या लगत असल्यामुळे पूर्ण शेतीचे नुकसान झाले होते. त्या चिंतेत अमित मोरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असून विरूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण व बीट हवालदार कुरसंगे मेजर व शिपाई सुरेंद्र काडे प्रवीण कामडे घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. व शव राजुरा येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पुढील तपास विरूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार कुरसंगे मेजर करीत आहे.