Top News

श्री.रामसेतूच्या पायथ्याशी असलेली देशी दारूभट्टीचे लवकरच होणार स्थलांतर #chandrapur


चंद्रपूर:-शहरातील जगन्नाथ बाबा नगर येथील श्री. रामसेतु पुलीच्या पायथ्याशी असलेली ती वादग्रस्त देशी दारू भट्टी नुकतीच सुरू करण्यात आली होती. मात्र, माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या सतर्कतेने ती वादग्रस्त दारूभट्टी पुन्हा एकदा बंद पडली.
यावर पावडे यांनी लगेच जिल्हाधिकारी व दारूबंदी विभागाचे अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधून आदिच आमचे आंदोलन सुरू आहे आणि पुन्हा आज सुरू केली ते तातडीने बंद करावी नाहीतर आम्ही आक्रमकतेने बंद पाडू असे सांगितले दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दारू बंदी विभागाच्या अधिकाऱ्यांना या बद्दल सक्तीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले यासंदर्भात अनेकदा निवेदने सुद्धा देण्यात आली होती. दरम्यान ही बाब आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या देशी दारू भट्टी संदर्भात कठोर पाऊल उचलत जिल्हाधिकारी दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या सूचना करत सदर देशी दारूभट्टी लवकरात लवकर या परिसरातून स्थलांतरित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच सदर दारुभट्टीच्या डोकेदुखी पासून येथील नागरिकांची सुटका होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील दारू विक्रेतांना सत्ताधाऱ्यांनी एक प्रकारे मनमर्जी कारभाराची मोकळीकच दिली होती. तसेच नियम धाब्यावर बसून वाट्टेल तिथे दारु दुकानाचे परवाने वाटण्यात आले. परिणामी सामान्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परंतु सत्तांतरानंतर राज्यात भाजपा सरकार येताच या सर्व कारभाराला पायबंद घातल्या जात आहे.लोकआग्रहास्तव या दारूभट्टीला येथून स्थलांतरित करण्यासाठी यापूर्वी देखील राहुल पावडे यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या सह एल्गार आंदोलन पुकारण्यात आले होते. मोठ्याप्रमाणात विविध माध्यमातून आंदोलनाची जणू मालिकाच हाती घेण्यात आली होती. परंतु, संबंधित विभागाकडून केवळ टोलवाटोलवी सुरू होती.
मध्यंतरी दारुभट्टीला घेवून मनपावरही आरोप प्रत्यारोपाची राळ उठविल्या गेली व यात काही लोकांनी राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदर दुकानावर कार्यवाहीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचीच भूमिका महत्वाची होती, हे यावरून पुन्हा स्पष्ट होत आहे. नुकतच भाजपच्या वतीने दारू दुकानाला परवानगी न देण्यात यावे याकरिता निवेदन सुद्धा देण्यात आले आहे व या दारूभट्टीच्या बाबतही लोकांमध्ये आक्रोश असताना आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना या देशी भट्टी बाबत सक्तीच्या सूचना दिली आहे या अनुषंगाने सदर देशी दारू भट्टी स्थलांतरणाचा ऑर्डर निघणार आहे त्यामुळे येथील दारु दुकान हटविण्यात येणार असल्याने या भागातील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती राहुल पावडे यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने