Top News

कार्यकर्त्याच्या घरात काँग्रेस नेत्यांना झाले साहिलच्या कुटुंबियांचे दर्शन #chandrapur #gondpipari


गोडपिपरी तालुक्यातील पूरग्रस्त तोहोगावचा प्रकार
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
गोंडपिपरी:- तालुक्यातील तोहोगाव येथील साहिलचा मेंदूज्वराने मृत्यू झाला.राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्यासह विजय वडेट्टीवार यांनी तोहगावला भेट दिली.दरम्यान मृतकाच्या घरी भेट न देता थेट तेथील कॉंग्रेस कार्यकर्ते फिरोज पठाण यांच्या घरी साहिलच्या कुटुंबियाना बोलावून १०,००० रक्कम मदत म्हणून दिली व सांत्वनही केले. ही नक्कीच दिलासा देणारी बाब आहे. दरम्यान अचानक हा प्रकार कॉंग्रेस नेत्यांनी घडवून आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
गोंडपिपरी तालुक्यात मागील काही दिवसापूर्वी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. वर्धा नदीला पूर आल्याने तोहोगावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला. गावाला बेटाचे स्वरूप आले.मार्ग बंद झाले. अश्यास्थितीत साहिलला ताप आला. तापाने फणफनत असल्याने प्रारंभी त्याला तोहगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. 
मेंदूज्वर झाल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले.पुराच्या पाण्यातुन लोकांनी जीवघेणा प्रवास केला.यास्थितीत गावकऱ्यांनी लाकडी नावेनी रुग्णाला गावाबाहेर आणण्याचा प्लान ठरला.इकडे कन्हाळगाव मार्गे गोंडपिपरीचे तहसीलदार के. डी .मेश्राम रूग्णवाहिका घेऊन हजर झाले.मात्र कक्ष क्रमांक ४ मधील रस्त्यावर मोठे झाड उन्मळून पडल्यामुळे समोर जाता येत नव्हते.दरम्यान साहिलला माघारी परतावे लागले. दुसऱ्या दिवशी कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण हे वनविभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने मार्गावरील झाड बाजूला करीत मार्ग मोकळा करून दिला.ते स्वतः लाकडी नावाने तोहोगावला दाखल झाले आणि साहिल उपचारासाठी चंद्रपूरकडे रवाना झाला.मात्र वेळेत उपचार न झाल्याने नागपूर येथे साहिलचा मृत्यू झाला.पुराच्या पाण्याने साहिलचा बळी घेतल्यामुळे तालुक्यासह जिल्हा हळहळला.
 (दि.२२) कॉंग्रेसचे आमदार सुभाष धोटे व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तोहोगावला भेट दिली.दरम्यान मृतक साहिल यांच्या घरी भेट न देता तेथिल कॉंग्रेसचे कार्यकर्ते फिरोज पठाण यांच्या घरी साहिलच्या आईवडिलांना बोलावूंन १०,००० रक्कम मदत म्हणून दिलीदरम्यान साहिलच्या आईचे चेहऱ्यावर समाधान दिसून आले नाही. त्याचवेळी तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली.
यादरम्यान बलारपूर तालुक्यातील कोर्टिमक्ता येथील सचिन गायकवाड याचा अपघाती मृत्यू झाला. यानंतर सबंधित क्षेत्राचे आमदार म्हणून कार्यरत असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी २ लाखाची निधी मंजूर केली.त्यांच्या या निर्णयाबदल बाहेर क्षेत्रातील साईनाथ मास्टे या भाजपाच्या गोंडपिपरी तालुका कार्याध्यक्षसह तालुक्यातील नागरीकांनी त्याचे आभारही मानले.मात्र याच जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांनी छोटेखानी मदत केल्यानंतर सर्वत्र आचर्य व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने