एकाच दिवशी चार युवकांची आत्महत्या #suicideवर्धा:- जिल्ह्यात वेगेवगळ्या ठिकाणी चार जणांनी १९ जुलै रोजी या एकाच दिवशी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविली आहे. यात आत्महत्या करणारे चौघेही ३५ वर्षांआतीलच असल्याचे समोर आले आहे. यामुळे, वर्धेत झालेला या आत्महत्यांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाण्यात उडी घेऊन आत्महत्या

बचतगटाचे घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ३५ वर्षीय युवकाने राजेंद्र डागा यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली. ही घटना १९ जुलै रोजी उजेडात आली. श्याम बबनराव मेश्राम (रा. कुटकी नवीन वस्ती ता. हिंगणघाट) असे मृत युवकाचे नाव आहे. सदर युवक मृतावस्थेत शेतातील गाळात पालथा पडून होता. या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आला आहे.
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

२० वर्षीय युवकाने घरी कोणीही हजर नसताना दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना देवळी येथील वार्ड क्र.१४ मध्ये १९ जुलै रोजी घडली. गौरव संतोषराव धांदे (रा. देवळी) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आला आहे.
दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

आर्थिक विवंचनेत असलेल्या रामगनर परदेशीपुरा येथील ३५ वर्षीय मनोज सुधाकर किनगावकर याने घरी नायलाँन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १९ जुलै रोजी उजेडात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आला आहे.
पवनार मध्ये युवकाची आत्महत्या

घरातील स्वंयपाकाच्या ओट्याजवळ टिनाच्या छताला नायलाँन दोर बांधून गळफास घेऊन ३५ वर्षीय इसमाने आत्महत्या केली. ही घटना पवनार येथे १९ जुलै रोजी उघडकीस आली. दिलीप राघोबाजी चुटे (वय ३५) रा. पवनार असे मृताचे नाव आहे. मृतकाला दारू पिण्याचे व्यसन होते. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत