आमदार मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने विद्यार्थ्यांचा सुटला प्रश्न #pombhurna

Bhairav Diwase

माजी पंचायत समिती सभापती अल्का आत्राम यांचा पुढाकार
पोंभूर्णा:- भाजपानी विद्यार्थ्यांची तसेच पालकांची समस्या ऐकताच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी कार्यालय, गोंडपिपरी येथील अवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र,नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्र तसेच नागरिकांचे अन्य दाखले प्रलंबित असल्याची तक्रार विद्यार्थी तसेच पालकांनी पोंभूर्णा भाजपा पदाधिकारी यांना केली. तर कु. अल्काताई आत्रम माजी सभापती पं. स. पोंभूर्णा, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली.
या अव्यवस्थेमुळे परिसरातील विद्यार्थी, पालक, शेतकरी व अन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, तरी सदर व्यवस्था तातडीने दूर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपण त्वरित दखल घेऊन सदर अव्यवस्था दूर करणे बाबत आपले स्तरावरून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी विंनती तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांनी केली असता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र देऊन त्वरित योग्य कार्यवाही करण्यात यावी अश्या सूचना केली. अधिकाऱ्यांनी यापुढे असे होणार नाही असे सांगून अश्वस्त केले.