Top News

टोक येथील १०५ जणांना केले स्थलांतर #chandrapur #pombhurna


चेक ठाणेवासणा जि.प.शाळेत केली राहण्याची व्यवस्था
पोंभूर्णा:- तालुक्यातील दोन नदिच्या मधात वसलेल्या टोक येथील १०५ जणांना प्रशासनाने पुर परस्थितीचा विचार करता खबरदारी म्हणून स्थलांतर केले असून त्यांची चेक ठाणेवासना येथील जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तालुक्यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.यामुळे ६० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. यासोबतच गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असल्याने दोन नदिच्या मधात वसलेल्या टोक या गावात पुर परस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने तालुका प्रशासनाने खबरदारी घेत टोक यथील १०५ लोकांना स्थलांतरित करण्यात आले.यातील ८४ जणांची चेक ठाणेवासना येथील जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार शुभांगी कनवाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, ठाणेदार किशोर शेरकी, नायाब तहसिलदार आनंदराव तिराणकर, गट विकास अधिकारी महेश वाळवी, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके,तलाठी जयंत मोरे, सरपंच सुरेखा मेश्राम, उपसरपंच डॉ.नितेश पावडे, राशन दुकान संघटनेचे तालुकाध्यक्ष कवडू कुंदावार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने