Top News

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा #Pombhurna


शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या प्रशासनाला सूचना


पोंभुर्णा:- तालुक्यातील पूर परिस्थितीचा मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांनी गंगापूर, टोक, जुनगाव-देवाडा पुल, घाटकूळ पुल, थेरगाव पुल अश्या अनेक ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली व तेथील पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. परंतु सध्या पाऊसाचा जोर कायम असल्यामुळे पुराचे पाणी वाढत आहे.

भविष्यात काही अडचण निर्माण झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना कळवावे आम्ही सदैव सोबत आहोत असे गावकऱ्यांना सांगण्यात आले.

टोक हे गाव दोन नदीच्या मध्ये असल्यामुळे चारही बाजूंनी पाण्यानी वेढले होते. तेथील लोकांचे स्थलांतरण करणे अत्यावश्यक होते त्यामुळे चेकठानेवासना येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली. मा. देवराव दादा भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर यांनी टोक येथील लोकांशी व्हिडिओ कॉल द्वारे चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी भाजपा पदाधिकारी यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी, विनोद देशमुख, ईश्वर नैताम, ओमदेव पाल, रोशन ठेंगणे, दर्शन गोरंटीवार, बंडू बुरांडे, प्रभाकर पिंपळशेंडे, शेखर व्याहाडकर, वैभव पिंपळशेंडे, स्वप्नील बुटले, सुधाकर डायले, सुरेखा मेश्राम आणि सर्व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने