Top News

नगरपरिषद व नगरपंचायतीचे अध्‍यक्ष तसेच ग्राम पंचायतीचे सरपंच जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडणार #chandrapur


लोकाभिमुख निर्णयाबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन
चंद्रपूर:- राज्‍यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीतील अध्‍यक्ष जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडण्याचा तसेच ग्राम पंचायतींचे सरपंच सुध्‍दा जनतेतुन थेट निवडणूकीद्वारे निवडण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला . हा लोकाभिमुख निर्णय घेतल्या बद्दल माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
दिनांक ७ जुलै २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वरील मागण्‍यांच्‍या अनुषंगाने उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्‍यांना निवेदन सादर करून चर्चा केली होती.
नगरपरिषद व नगरपंचायत च्‍या कामकाजामध्‍ये स्‍थैर्य प्राप्‍त होण्‍याकरिता लोकांमधून नगरपरिषद व नगरपंचायतीच्‍या अध्‍यक्ष पदाकरिता थेट निवडणूक घेणारी यंत्रणा पुन्‍हा अंगीकारणे आवश्‍यक आहे अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी या चर्चेत विशद केली होती. तसेच ग्राम पंचायतीच्‍या कामाकाजामध्‍ये स्‍थैर्य प्राप्‍त होण्‍याकरिता लोकांमधून ग्राम पंचायतीच्‍या सरपंच पदाकरिता थेट निवडणूक घेणारी यंत्रणा पुन्‍हा अंगीकारणे आवश्‍यक आहे. पंचायतीच्‍या परिणामकारक कामकाजासाठी आणि विकासासाठी सरपंचाचे पद सक्षम करण्‍याकरिता व निवडून दिलेला सरपंच हा आपल्‍या गावातील लोकांना थेट जबाबदार असण्‍याकरिता सरपंच थेट जनतेतुन निवडून येणे आवश्‍यक आहे असे मत आ. मुनगंटीवार यांनी या चर्चेत मांडले होते. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. या दोन्ही मागण्या तातडीने पूर्ण करत लोकाभिमुख निर्णय घेतल्या बद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने