विरूर स्टेशन पोलीस ठाण्यातील पथकाची साहसी कामगिरी कौतुकास्पद, अभिमानास्पद:- हंसराज अहीर #chandrapur #rajura #chandrapurplice


पोलिसांनी वाचवले ३५ प्रवाशांचे प्राण
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात मागील ३-४ दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. सर्वत्र नदी-नाल्याना पूर आला आहे. राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. जवळ असलेल्या नाल्यात बस चालकाच्या चुकीने बस पुराच्या पाण्यात अडकली व अडकलेल्या ३५ प्रवाशांना विरूर पोलीस ठाण्यातील पथकाने व नागरिकांच्या धाडसी कामगिरीने सर्वाना सुखरूप बाहेर काढून प्राण वाचविले. पोलिसांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन केलेले हे कार्य कौतुकास्पद, अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील पोलिसांनी केलेली ही कामगिरी साहसी असून या पथकातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन ही हंसरारजी अहीर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत