चंद्रपूर:- दि. 12 जुलै रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजयुमो महामंत्री तथा उपसभापती महेश देवकते यांनी जिवती तालुक्यातील पूरग्रस्त गावामध्ये जाऊन पाहणी केली.
मागील पाच-सहा दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील काल सायंकाळी मौजा आनंदगुडा येथे पावसामुळे घर पडून नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुके जनावरे मृत होऊन पूर्ण घराचे नुकसान झाले आहे. सोबतच दिनांक 12 जुलै 2022 ला 4 00 वाजताच्या सुमारास चिखली खु, कामतगुडा, हिमायतनगर, येथील लोकांना भेटून मदत कार्य केले.