अमलनाला धरण १००% भरला #amalnala

Bhairav Diwase


गडचांदुर:- अमलनाला धरण हे या वर्षी सुधा १००टक्के भरले असून पर्यटकांना भुरळ पाडणारे वेस्ट वेअर ओव्हर फ्लो झाल्या मुळे पर्यटक आता जाण्यास सज्ज झाले आहे.
अमलनाला धरण हे पर्यटन स्थळ यावर्षी संततधार पाऊसात १०० टक्के भरले असून वेस्ट वेअर सुरु झाले आहेत.
डोंगरदऱ्या च्या मधात वसलेले धरण निसर्गसौंदर्य ने नटलेला आहे.
मागील वर्षी झालेल्या दुर्घटना लक्षात घेता पोलीस प्रशासन व सिंचाई विभागाने खबरदारी घेतली आहे. पर्यटकांनी पाण्यात उतरुन जीव धोक्यात घालू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी केले आहेत.