महाकाली काँलरी परिसरात कोसळलं झाड #Chandrapur # tree

Bhairav Diwase
बचाव कार्यासाठी अखिलेश रोहिदास यांनी साधला प्रशासनाशी संपर्क 
चंद्रपूर:- चंद्रपूर मध्ये सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे इरई धरणाचे सात दारे उघडण्यात आले आहे. तरी नदीकाठी असलेल्या भागांमध्ये जागोजागी पाणी साचले आहे. दि. 13 जुलैला रात्री 7 वाजताच्या सुमारास महाकाली काँलरी  परीसरातिल 4 घरावर झाड कोसळलं, यात जीवित हानी झाली नसून घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
 आ. सुधीर मुनगंटीवार  यांच्या मार्गदर्शनात  अखिलेश रोहिदास यांनी ब्रिजभूषण पाझारे यांना संपर्क साधला असता  पाझारे यांनी NDRF टीमला पाचारण केले NDRF टीमने घटनास्थळी येउन घरावर पडलेल्या झाडाला हटविले.