लोकसभा प्रवास योजना कार्यक्रमानिमित्त बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची बैठक संपन्न #chandrapur


चंद्रपूर:- २०२४ ची लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने “लोकसभा प्रवास योजना” कार्यान्वित केली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात येत्या काही दिवसांत केन्द्रीय मंत्री तथा लोकसभा क्षेत्राचे प्रभारी मा. ना. हरदिपसिंह पुरी यांचा प्रवास होणार आहे. या निमित्याने (दि.7 जुलै) रोजी चंद्रपुरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोअर कमेटी सदस्य तथा प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे प्रभारी माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.


या बैठकीत, लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत करावयाच्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनार्थ आढावा घेऊन अनेक बाबींवर जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी विधानसभा प्रभारी तथा माजी आमदार सुदर्शनजी निमकर यांनीही याठिकाणी माहिती दिली.
यावेळी मंचावर, विधानसभा संयोजक प्रमोद कडू, माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा महामंत्री तथा लोकसभा विस्तारक नामदेव डाहुले, माजी जि. प. अध्यक्ष श्रीमती संध्याताई गुरूनूले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कु. अल्काताई आत्राम, विधानसभा विस्तारक विनोद देशमुख, संघटन प्रमुख राम लाखीया यांचेसह बैठकीस अपेक्षित मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत