Top News

शिवसैनिकासह दोघांवर लावलेले खोटे गुन्‍हे मागे घ्यावे #Jivati


शिवसेना महिला आघाडीचे जिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन
चंद्रपूर:- शासकिय कामात अडथळा आणत शासकीय कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याच्या कारणावरून जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील शिवसैनिकासह व इतर दोघांविरुद्ध जिवती पोलिसात द्वेशभावनेतुन खोटी तक्रार देऊन गुन्‍हे दाखल करण्यात आले. ते खोटे गुन्‍हे त्‍वरीत मागे घेण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
            जिवती तहसिल कार्यालयात पांडुरंग नंदुरकर हे संजय गांधी निराधार योजना कक्षात अव्वल कारकून म्हणून कार्यरत आहेत. परंतु एका निराधार महिलेनी शिवसैनिकांकडे तक्रार केली की, नंदुरकर हे कामासाठी पैसे मागत आहेत. तेव्हा तात्काळ शिवसैनिक सिंधुताई जाधव व त्यांच्यासह अरविंद चव्हाण व जिवन तोगरे हे नंदुरकर यांना विचारणा करण्यास गेले असता, नंदुरकर यांच्यात व शिवसैनिकात बाचाबाची झाली. परंतु यात शासकिय कामात अडथळा आणण्याचा उद्देश येत नाही. ते निराधार महिलेला न्‍याय मागविण्यासाठी गेले होते.
         
          सिंधूताई जाधव व त्यांच्या सोबत आलेले अरविंद चव्हाण व जीवन तोगरे यांनी नंदुरकर यांना विचारले की, तुम्ही अधिकारी लोकांकडून पैसे का मागता? हा सवाल केला. हाच मनात राग धरुन नंदुरकर यांनी द्वेशभावनेतुन शिवसैनिकांची खोटी तक्रार दाखल केली. त्‍याआधारे कलम ३५३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
                  मात्र, निराधार महिलेला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने गेलेल्या शिवसैनिकांवर लावलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व निराधार महिलेला लाच मागणाऱ्या नंदुरकर यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी व अशा लाचखोर कर्मचाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी जिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे शिवसेना महिला आघाडीच्‍या जिल्‍हा संघटीका उज्‍वला प्रमाेद नलगे यांनी केली आहे. शिष्टमंडळात शिवसेना महिला आघाडीच्‍या सौ. विद्या ठाकरे, बबली पारोडी, रोहिणी चौबे, श्रृती घटे व महिला आघाडीच्या सदस्‍यांची उपस्‍थिती होती. 
                  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने