अतिवृष्टी संपेपर्यंत सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालयांना सुट्या जाहीर कराव्या #chandrapurप्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग वेगळा आहे असा दुजाभाव व प्रश्नचिन्ह नको

दोन्हीही विभागाला समान अधिकार द्यावे

भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावारांची अतिरिक्त जिल्हाधिका-यांमार्फत जिल्हाधिका-यांना निवेदनाद्वारे मागणी


चंद्रपूर:- अतिवृष्टी संपेपर्यंत सर्व सरकारी व खाजगी शाळा,महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्याची मागणी भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केली आहे.याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्याकडे निवेदन सोपविण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी जिल्हाधिका-यांच्यावतीने योग्य सहकार्याची ग्वाही दिली.
यावेळी सदर निवेदनातून कोलावार म्हणाले की
महाराष्ट्र व प्रामुख्याने विदर्भात सर्वञ गत ८ ते १० दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे.या पावसामुळे नद्या,नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.पुराच्या पाण्यात वाढ होऊन नदीकाठची गावे पाण्यानी वेढलेले आहे.राज्य महामार्गातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते जलमय झाली असून सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
त्यामुळे शाळेत जाणा-या विद्यार्थी,शिक्षक, कर्मचा-यांची परिस्थिती खूप खराब आहे.अशा परिस्थितीत कुणाचे काही बरे-वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती,गावातील धार्मिक कार्यक्रम,स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन संबधित गावातील शाळांना शैक्षणिक वर्षात दोन सुटी देण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना असायचा.माञ यावर्षी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांचा हा अधिकार हिरावल्याने नैसर्गिक आपत्तीच्यावेळी शाळांना सुटी कशी द्यायची असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत येत असलेल्या प्राथमिक विभागाने मुख्याध्यापकांच्या अधिकाराखाली येत असलेली सुटी नाकारली आहे.तर माध्यमिक विभागाने मुख्याध्यापकांच्या अधिकाराखाली येत असलेली सुटी दिली आहे.
त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विभाग वेगळा आहे का असा दुजाभाव व प्रश्नचिन्ह शिक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. तरी जिल्हा प्रशासनांनी याबाबत विचार करुन तात्काळ योग्य निर्णय घेऊन अतिवृष्टी संपेपर्यंत सर्व सरकारी व खाजगी शाळा,महाविद्यालयांना सुट्या जाहीर कराव्या अशी मागणी महेश कोलावार यांनी यावेळी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या