Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

पट्टेदार वाघाच्या हल्यात बैलासह शेतकरी ठार; एक बैल जखमी #chandrapur#chimur

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- जंगलात चरत असलेल्या बैलांवर वाघाने हल्ला करून एकास ठार केले. तर दूसऱ्यास जखमी केले. याच दरम्यान बैलांना वाघाच्या हल्ल्यातून वाचविण्याचा प्रयत्न करणा-या शेतक-याचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी (दि.१५ ) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ताडोबा अभयारण्यातील बफर क्षेत्रात कक्ष क्रमांक ३९० मध्ये घडली. सीताराम नन्नावरे (रा. अलीझंझा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील बामणगाव, टेकेपार व अलिझंजा या गावांना लागून जंगल असल्याने वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. परंतु, गावकऱ्यांना शेतामध्ये जळावू लाकडे गोळा करण्यासाठी व गुरे चारण्यासाठी जंगलात जावे लागते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील अलिझंजा येथील शेतकरी हा बैल चारण्यासाठी आज शुक्रवारी दूपारी गेला होता. बैल चरत असताना पट्टेदार वाघाने प्रथम एका बैलावर हल्ला केला. त्यानंतर दुस-यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान शेतक-याने वाघाला रोखण्याचा प्रयत्न केला असता वाघाने शेतक-यावर देखील हल्ला केला. यात शेतकरी सिताराम नन्नावरे हा जगीच ठार झाला. तर दूसरा बैल जीव वाचवून घरी परतला. परंतु, हा बैल जखमी झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत