चंद्रपूर जिल्ह्यातील अभाविप मधील कार्यकर्त्यांची संघटनात्मक घोषणा #chandrapur

Bhairav Diwase



  चंद्रपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशातीलच नाहीतर जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. हे आपण जानताच नुकताच यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १२ ते १५ जुलै रोजी विदर्भ प्रदेश कार्यकर्ता अभ्यासवर्ग पार पडला.
यामध्ये अभाविप अमृत महोत्सवी वर्षात विविध घोषणा व नूतन पूर्णवेळ पण निघाले यात विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख, नूतन पूर्णवेळ, जिल्हा संयोजक म्हणून घोषणा करण्यात आल्या.
यामध्ये चंद्रपूर जिल्हा सह संयोजक आशुतोष द्विवेदी यांची नूतन पूर्णवेळ कारंजालाड नगर संघटनमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. तसेच चंद्रपूर नगर संघटनमंत्री म्हणून नूतन पूर्णवेळ ऋतिक कनोजिया यांची घोषणा करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा प्रमुख प्रा. धनंजय पारके, चंद्रपूर जिल्हा संयोजक म्हणून शैलेश दिंडेवार, सह संयोजक म्हणून जयेश भटगरे यांची घोषणा करण्यात आली.याबद्दल चंद्रपूर जिल्हातून विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे.