मध्यप्रदेशचे 150 कामगार अडकले चंद्रपुरात #chandrapur

तीन दिवसांपासून बसमध्येच...
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे मध्यप्रदेशातून हैदराबादकडे निघालेले जवळपास दीडशे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत.
महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा राजुरा शहराजवळचा मोठा पूल वर्धा नदीच्या पुरामुळे गेलाय पाण्याखाली गेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे प्रवासी बसमध्ये अडकून पडलेत.
चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी होत असल्याने नदी-नाल्यांना आलाय पूर आला आहे. त्यामुळे बसमध्येच अडकलेल्या महिला, मुलं आणि पुरुषांना हैदराबाद इथं आपल्या कामाच्या स्थळी जाण्याची प्रतीक्षा आहे. अडकलेल्या कामगारांना स्थानिक लोकांच्या मदतीने भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र पूर केव्हा ओसरेल आणि वाहतूक केव्हा सुरू होईल याकडे या कामगारांचं लक्ष लागलं आहे.
पुलाच्या दोन्ही टोकाला बसेस आणि मालवाहू ट्रक यांच्या रांगा लागल्या आहेत. तीन दिवसांपासून हे प्रवासी बसमध्ये अडकून पडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी होत असल्याने नदी-नाल्यांना पूर आलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या