काय हा रोड, काय ते खड्डे, काय तो चिखल, तरी पण विरूर स्टेशन गाव ओकेच! #Rajura

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरूर स्टेशन परिसरातील मागील आठवड्यापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे या परिसरात पाण्यामुळे प्रत्येक नाले व नदी पूर्णपणे भरले आहे. विरूर स्टेशन परिसरात अनेक गाव येतात त्या गावांमधील विरूर स्टेशन हा लोकसंख्येने मोठा गाव असून या गावात आठवडा बाजार भरपूर मोठ्या प्रमाणात भरतात आणि बस स्टॉप वरून मार्केटला जाण्यास एकच मार्ग आहे तो म्हणजे बस स्टॉप चौक ते छत्रपती शिवाजी चौक मार्केट आणि ह्या रस्त्यावरील सध्या ची परिस्थिती इतकी गंभीर आहे की पायदळ चालताना कळत नाही की रस्ता कुठून आहे व हा रस्ता पाण्यावरती रस्ता बनलेला आहे का असे लोकांच्या मनात भावना निर्माण होत आहे.
आणि त्या रस्त्यावरील दुचाकी नेणे म्हणजे पाण्याच्या गड्ड्यात पडण आहे किती वर्षे पूर्ण झाले तरी पण ह्या रस्त्याकडे कोणाचे लक्ष का जात नाही विरूर स्टेशनच्या मेन रस्ता गावांमधील जाणारा याच्याकडे ग्रामपंचायत विरूर स्टेशन का? लक्ष देत नाही. हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे कारण सध्या ची स्थिती त्या रस्त्यावरील जाण्याकरिता मार्ग पूर्णपणे चिखलाने व पाण्याने भरून असल्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.