🌄 💻

💻

स्कार्पिओ-अल्टोची समोरा समोर धडक #chandrapur #accident #Korpana

एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना

कोरपना:- वणी कडून येणाऱ्या अल्टो कोरपना कडून जाणाऱ्या स्कार्पिओ समोरसमोर जोरदार धडक बसल्याने एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर रीत्या जखमी झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील पारधीगुडा फाट्या जवळील तालुका क्रीडा संकुल समोर घडली.

या अपघातात स्वप्निल संदेश इटनकर (अंदाजे २१ वर्ष) रा. कोरपना याचा जागीच मृत्यू झाला. तो वणी वरून आपल्या अल्टो जी जे १० एसी ५७३४ या वाहनाने कोरपना कडे येत होता. तर स्कार्पिओ एम एच ३८ ४३८३ हे वाहन कोरपना कडून वणी कडे जात होते. यात दोघे गंभीररित्या जखमी झाले. यात जखमी झालेल्यांची नावे कडू शकले नाही. त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत