पुरात अडकलेल्या ट्रक चालकांना फळ व बिस्कीट वाटप #RAJURA

Bhairav Diwase
0

आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट गाईड यांचा संयुक्त उपक्रम.


राजुरा:- दि. 13 जुलै पासून चंद्रपूर -हैद्राबाद राज्य महामार्गावरील वर्धा नदी व राजुरा सास्ती मार्गावरील धोपटाळा येथील पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यामुळे दक्षिण भागातून येणाऱ्या शेकडो ट्रकांच्या रांगा राजुरा येथे लागलेल्या आहे. या ट्रक चालकांना दि.16 जुलै ला सकाळी फळ व बिस्कीट चे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय हरित सेना प्रमुख बादल बेले यांच्या पुढाकारातून व आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम घेण्यात आला. यावेळी सहायक शिक्षक रुपेश चिडे, विध्यार्थी प्रमुख राधिका चेडे, साहिल नंदीगमवार आदीसह राष्ट्रीय हरीत सेना विभागाचे विध्यार्थी तसेच स्काऊट गाईड युनिट चे विध्यार्थी प्रामुख्याने सहभागी झाले. पर्यावरण संवर्धना सोबतच मानवता सेवा करणे हे आपले कर्तव्य असून यापूर्वी आदर्श शाळेतील विध्यार्थीनी अनेक समाजपायोगी उपक्रम घेतले आहे.

यापूर्वीही पूरग्रस्त भागातील गरजू करिता निधी संकलन करून राजुरा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीत ती रक्कम दिली व विविध संदेशात्मक उपक्रम घेऊन या शाळेतील विध्यार्थी नेहमीच जनजागृतीचा प्रयत्न करीत असतात. या विध्यार्थीनी पुरात अडकलेल्या ट्रक चालकांना फळ व बिस्कीट चे वाटप केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)