Top News

चंद्रपूर-अहेरी-सिरोंचा मार्गावरील सिरोंचा स्थित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ च्या पुलाला मा. सा कन्नमवारांचे नाव द्या #chandrapur


महेश कोलावारांची आ. सुधीर मुनगंटीवार यांचेमार्फत गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडे मागणी
चंद्रपूर:- चंद्रपूर-अहेरी-सिरोंचा मार्गावरील सिरोंचा स्थित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.१६ च्या पुलाला मा. सा कन्नमवारांचे नाव देण्याची मागणी भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन आ. सुधीर मुनगंटीवार यांचेमार्फत गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहे.

सदर निवेदनातून महेश कोलावार म्हणाले की सिरोंचा हे शहर गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या शेवटचा टोकावर वसलेले तालुक्याचे ठिकाण आहे.शहरालगत महाराष्ट्र व तेलंगाणा असे दोन राज्याला जोडणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता-गोदावरी नदीवर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा पुल बांधण्यात आला आहे.
पुलाचे उद्घाटन वर्ष २०१७ च्या दरम्यान राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.हा पुल राष्ट्रीय महामार्ग क्र.१६ च्या यादीत येत असून शहरालगतच्या तीन राज्यातील लोकांना शिक्षण, आरोग्य, उद्योगधंदे व प्रवासरित्या अत्यंत सोयीस्कर आहे.या भागात आदिवासी समाजासोबत बहुजन (ओबीसी) समाजाचे लोकही जास्त प्रमाणात वास्तव्याला राहतात.
सदर पुलाला ओबीसी समाजाचे नेते व महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंञी असलेले मा. सा कन्नमवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सिरोंचा शहरातील ओबीसी वासियांच्या सुचनेने भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी पुढाकार घेऊन मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने