Top News

ॲड. दीपक चटपने वाढविला समाजाचा गौरव:- ॲड. पुरुषोत्तम सातपुते #chandrapur


धनोजे कुणबी समाज चंद्रपुर कार्यक्रमात प्रतिपादन
चंद्रपूर:- चंद्रपूर येथे दि. २४ जुलैला धनोजे कुणबी समाज मंडळ चंद्रपूरद्वारे आयोजित गुणवंत गौरव व सत्कार सोहळा संपन्न झाला. ब्रिटिश सरकारची चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवणारे देशातील कमी वयाचे तरुण वकील ॲड. दीपक चटप यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना ॲड. दीपक चटप यांनी रम, रमा आणि रमी या तीन व्यसनांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहा असा मार्मिक सल्ला दिला. समाजाचा मी ऋणी असून समजासाठी योगदान देण्यासाठी कार्यशील असेल असेही दिपकने सांगितले.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सोबतच कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा देणारे डॉक्टर कोरोना योद्धा म्हणून डॉ. सचिन धगडी, डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. विनोद मुसळे, डॉ. आशीष पोडे, डॉ. अमीत ढवस यांचा सत्कार तर आचार्य पदवी प्राप्त प्रा. डॉ. प्रविण चटप, मिस डी.सी. इंडिया पुरस्कार प्राप्त कु. गायत्री सूर्यभान उरकुडे तसेच समाजासाठी प्रचार प्रसाराचे उत्कृष्ठ कार्य करणारे श्री हितेश गोहोकार व साईनाथ कुचनकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या समोरील शिक्षणासाठी त्यांना लाभ व्हावा, यासाठी घडलेल्या मान्यवरांच्या अनुभवाचे बोल, त्यांना विविध विषयांवर विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा यशाची गुरुकिल्ली करिअर मार्गदर्शक पुरवणीचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले, सोबतच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. अशोक जीवतोडे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. विशाल भेदुरकर, प्रमुख अतिथी म्हणून मा सुधाकर अडबाले, मा राजू धांडे, मा मनोहरजी पाऊणकर, डॉ सुरेश जी महाकुलकर इंजि. दिलिप झाडे, पांडुरंग जी टोंगे, तर गुणवंत गौरव सोहळा समिती प्रमुख महेश खंगार, नामदेव मोरे, अण्णाजी जोगी, सविता कोट्टि, गणपत हींगाने, अनिल डहाके, वासुदेव बोबडे, वसंत वडस्कर, सतिश मालेकर, विजय मुसळे, भाऊरावजी नीखाडे, लक्ष्मीकांत धानोरकर, संतोष देरकर आणि समाज मंडळातील पदाधिकारी श्री, सचिव अतुल देऊळकर, विनोद पिंपळशेंडे, अरुण मालेकर, विलास माथणकर, सतीश निब्रड, कौशिक माथणकर सोबतच हॉटेलचे विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेऊन हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा यशस्वी केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने