Click Here...👇👇👇

भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने पूरग्रस्त परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभी:- प्रज्वलंत कडू #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार, महाकाली प्रभागातील लोकांचे पुराच्या पाण्यामुळे फार मोठ्या प्रमाणात जे नुकसान झाले अश्या सर्व लोकांना सर्वोतपरी मदत करायसाठी गुरुमाऊली मंदिर येथे बैठक घेण्यात आली.

पुरामुळे ज्या लोकांच्या घरांचे नुकसान झाले पण आता पर्यंत पंचनामे झाले नाही अश्या परिवाराची पूर्ण माहिती घेण्यात आली. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने पूरग्रस्त परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं वक्तव्य भारतीय जनता युवा मोर्चा महामंत्री प्रज्वलंत कडू यांनी केले. सदर बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी पंकज चटकुले, निकेश ठाकूर,विक्की मोरे, कुणाल निकोडे आदी उपस्थित होते.