Top News

माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार विरोधात आक्षेपार्ह लिखाण #chandrapur


पोर्टल संपादक गौतम गेडाम विरोधात काँग्रेस कार्यकर्त्याची पोलीसात तक्रार
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांचे सह काँग्रेसचे इतर सात आमदार भाजपाच्या वाटेवर.. या आशयाखाली वृत्तपकाशीत करून राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा आधार देत तथ्यहीन आरोप करणारे साप्ताहिक विचारपीठ संपादक गौतम गेडाम याने काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांची राजकीय षडयंतत्रातून सूड व आकस बुद्धीने प्रतिमा मलिन करणे हेतू सततच्या चालविलेल्या लिखाणा विरोधात आज जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गौतम गेडाम विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, साप्ताहिक विचारपीठ न्यूज पोर्टल चे संपादक गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार तथा इतर पदाधिकाऱ्यां विरोधात बिन बुडाचे आरोप करीत तथ्यहीन वृत्त प्रकाशित करण्यापर्यंत न थांबता काल दिनांक 26 जुलै रोजीच्या प्रकाशित वृत्तात आमदार वडिलांची सहा काँग्रेसचे इतर सात आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे निराधार वृत्त प्रकाशित केले. सोबतच नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्याच्या राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांमध्ये आ. वडेट्टीवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करता पराभूत करण्याचे पक्षविरोधी कार्य केल्याचे वृत्तात नमूद आहे.
तसेच पाडापाडीच्या राजकारणातुन वडेवारांनी काँग्रेस पक्षाला सुरुंग लावला असे बदनामीकारक लिखाण करून आ. वडेट्टीवाराच्च्या विरोधकांकडून चक्क राजकीय वर्दहस्त कमी करण्याची सुपारी घेतल्याप्रमाणे साप्ताहिक विचारपीठ चे संपादक गौतम गेडाम याने सतत बदनामीचा सपाटा सुरू ठेवला. एकीकडे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी व जनसामान्य नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी ठिकठिकाणी पूरग्रस्त भागांचा दौरा करत पूर पिढीयांना न्याय देण्यासाठी राज्याच्या टोकापर्यंत पोहोचले असून मदत कार्य सुरू केले आहे. अशा निस्वार्थ व जनसामान्यांसाठी प्रामाणिकता बाळगणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर होणाऱ्या बिनबुळाच्या आरोपाविरोधात आज काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये साप्ताहिक विचारपीठ संपादक गौतम गेडाम याची विरोधात कठोर कारवाई करण्याची तक्रार दाखल केली आहे.
यात चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशन येथे काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा सचिव मुन्ना तावाडे यांचे नेतृत्वात कैलास दुर्योधन, नरेंद्र डोंगरे , गोड पिंपरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष रेखा रामटेके, मोनिका खोब्रागडे, रीमा पुणेकर, लीना पाटील, वीरांगणा रामटेके, विद्या कोंडावार ,प्रतीक दुर्योधन ,सारंग चालखुरे ,अर्जुन कुंभारे यांचे सह युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर व पदाधिकारी तसेच काँग्रेस कमिटी मूलतर्फे मुल पोलीस स्टेशन , गोंडपिपरी येथे तूकेश वानोडे, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार, तालुका उपाध्यक्ष नितेश मेश्राम, अजय माडूरवार, महेंद्र कुणघाडकर, सुरेश श्रीवास्कर, गायकवाड, तसेच जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व इतरही पोलीस ठाण्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदविल्याची माहिती आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने