🌄 💻

💻

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिपरी गावाला भेट #chandrapur


गावकऱ्यांतर्फे निवेदन सादर
भद्रावती:- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भद्रावती तालुक्यातील पूरग्रस्त पिपरी गावाला भेट देऊन तेथील पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व पूरग्रस्तांशी संवाद साधला.

यावेळी पिपरी, घोनाड व कोची गावातील नागरिक व राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका भद्रावती तर्फे नाम.अजित पवार यांना परिसरातील समस्यांचे निवेदन सादर करून या समस्या निवारण्याची मागणी केली.
गाव तथा परिसरातील समस्यांचा आपण शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी येथील गावकऱ्यांना दिले. पिपरी गावात आल्यानंतर ज्या ज्या भागात पुराने थैमान घातले त्या त्या भागाची त्यांनी पाहणी केली
      उकणी खाणीतील निघणाऱ्या मातीच्या भराव्यामुळे नदीचे पाणी थोपुन पिपरी गावात जेथून घुसले त्या नदीपात्राचीही त्यांनी पाहणी केली. याबरोबरच त्यांनी गाव तथा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला या दौऱ्यात अजित पवारांसोबत क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर ,सलील देशमुख,संजय खोडकेे,यांची उपस्थिती होती. या दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, नितीन भटाळकर, तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणनकर, विलास नेरकर, फैयाज शेख, सुनील महाले, रोहन कुटेमाटे,अमोल बड़गे,पनवेल शेंडे,संतोष वास्मवार, आशीष लिपटे,अनुप कुटेमाटे, डॉ.कुट्माटे, शिरसागर  ,रत्नाकर ठेबरे  सबीया देवगडे, किरण साळवे, सरपंच, गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत