Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू #chandrapur

नागभीड:- संततधार पावसाने नागभीड तालुक्यातील ब्रिटिश कालीन घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. आणि याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी संपूर्ण विदर्भातून पर्यटक या ठिकाणी येत आहेत. अश्यातच दि. 28 जुलैला नागभीड तालुक्यातील चिंधचक येथील इसम पर्यटनासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सदर इसमाचे नाव मधुकर कामडी वय (45) वर्ष रा. चिंधीचक येथील रहिवासी आहे.
सदर घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी मृतदेहाला बाहेर काढले व घटनेची माहिती वनविभाग व पोलीस विभाग यांना देण्यात आली. पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत