💻

💻

सलग दुसऱ्या दिवशी युवा मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त भागाचा दौरा #chandrapur


आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सारखे मदतगार नेते आपल्या सोबत असल्यावर पूरग्रस्त भागातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही:- आशिष देवतळे
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वर्धा नदीच्या पुराचे पाणी गणपती वार्ड, किल्ला वार्ड,सिद्धार्थ वार्ड आणि गांधी वार्डात अजून पर्यंत पूर्ण पणे उतरले नाही. अश्या क्षेत्राची पाहणी महाराष्ट्राचे लोकनेते लोकलेखा समिती अध्यक्ष मान.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली ज्यामध्ये काही घरांची भिंत पडलेली आढळली आणि काही घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाल्याचे आढळले तर काही घर अजूनही पाण्याखाली असल्याचे दिसून आले.
तसेच बल्लारपूरच्या प्राचीन किल्ल्याच्या भिंतीचा काही भाग धराशाही झाल्याचे आढळून आले या सर्व नुकसानीची नोंद भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच दोन दिवसांपूर्वी माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या झूम (vc) बैठकीत मदत कार्याला गती देणे तसेच गणपती वार्डात नाल्याच्या बाजूने पुराचे पाणी येऊ नये याकरिता गोल पुलिया ते पेपरमिल नाल्यापर्यंत संरक्षण भिंत बांधता येईल काय यासंबंधी पाहणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले याच अनुषंगाने आज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली.
या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे तसेच जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष मोहित डंगोरे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधाकर पारधी, भाजयुमो सोशल मीडिया विधानसभा प्रमुख पियुष मेश्राम व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली व नागरिकांना सतर्क राहण्याचे सांगितले तसेच जिथे कुठेही मदतीची गरज असल्यास संपर्क करा आम्ही मदतीला धावून येऊ असे आव्हान जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी नागरिकांना केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत