💻

💻

वडसा ते चंद्रपूर मार्गावरील सकाळची पँसेजर रेल्वेगाडी सुरु करा #Chandrapur

भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावारांची आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत रेल्वे मंञालयाकडे मागणी

चंद्रपूर:- वडसा ते चंद्रपूर मार्गावरील सकाळची पँसेजर रेल्वेगाडी सुरु करण्याची मागणी भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत रेल्वे मंञालयाकडे पाठविण्यात आले आहे.
सदर निवेदनातून महेश कोलावार यांनी म्हणाले की कोरोना काळात बहुतांश रेल्वेगाड्या बंद होत्या.त्यानंतर कोरोना काळाच्या शिथिलेनंतर काही गाड्या सुरु करण्यात आले.त्यात गोंदिया ते बल्लारशाह या मार्गावरील दोन पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.माञ वडसा ते चंद्रपूर दरम्यान सकाळच्या वेळेस जिल्हा ठिकाणापर्यंत चालणा-या पँसेजर रेल्वेगाडी अजूनपर्यंत सुरु करण्यात आलेली नाही.
रेल्वेनी प्रवास करणा-या प्रवाशांना अत्यंत सोयीची असलेली सकाळची पँसेजर बंद असल्याने प्रवाशांना याचा नाहक ञास सहन करावा लागत आहे.दुसरीकडे लालपरीचे टिकीटही भरमसाठ महागले आहे.त्यामुळे खासगी व सरकारी वाहनाने प्रवास करु इच्छिणा-या सर्व सामान्याला महागाईचा फटका बसत आहे.
वडसा शहर हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक आहे.या रेल्वेस्थानकावरुन सकाळच्या सुमारास कोरची, आरमोरी, गडचिरोली पासून तर नागभीड,मुल तालुका पर्यंतचे प्रवासी,सरकारी कर्मचारी,विद्यार्थी,छोटे-मोठे उद्योजक या रेल्नेगाडीने  प्रवास करतात.
सध्याच्या परिस्थितीत सर्वकाही सुरळीत आहे तरीही सदर रेल्वेगाडी सुरु केल्या नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे स्वर दिसत आहे.तरी या निवेदनाची दखल घेऊन लवकरात-लवकर सकाळची पँसेजर रेल्वेगाडी सरु करावी अशी मागणी महेश कोलावार यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत