पोंभूर्णा:- मागील आठवडाभरापासून पोंभुर्णा तालुक्यात संततधार पाऊस असल्याने अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. अंतिवृष्टीमुळे पोंभुणां तालुक्यातील अंदाजे ६० घरांचे अंशता : पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे . आर्थिक नुकसानीसह राहण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पडझड घरांचे तातडीने मोका पंचनामे करुन तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.
तसेच ज्यांच्या घरांची अतिवृष्टीमुळे पडझड झाली आहे.त्यांना आवास योजने अंतर्गत तातडीने घरकुलचा लाभ देण्यात यावा याकरिता पोंभूर्णा तालूका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष कवडू कुंदावार यांनी कांग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तहसिलदार शुभांगी कनवाडे यांना निवेदन देऊन मागणी केली.
यावेळी संजय गांधी निराधार कमेटीचे अध्यक्ष साईनाथ शिंदे, माजी नगरसेवक जयपाल गेडाम, सोमेश्वर कुंदोजवार, बामणीचे माजी सरपंच अनिल देऊवार, संजय कुंभरे यांची उपस्थिती होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत