वडिलाने घराबाहेर काढले म्हणून त्याने दर्ग्यातील दानपेटी फोडली #Chimurचिमूर:- तालुक्यातील नेरी येथील शांती वार्डातील हबिबखा उस्ताद दर्ग्या मधील दानपेटीचे कुलूप तोडून चोरी केली केल्याची घटना आज, शुक्रवारी (दि.२२जुलै) उघडकीस आली आहे. त्या अल्पवयीन मुलावर संशय येताच पोलिसांनी त्याचा ताब्यात घेताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. मात्र ही चोरी त्या मुलाने का केली याचे अजबच कारण पुढे आले.
17 वर्षीय तरुणाने वडीलाने घराबाहेर काढले म्हणून आपण चोरी केल्याची कबूली दिली आहे. दर्ग्यातून चोरी गेलेली रक्कम ही 20 हजार रुपयांची होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरी येथील शांती वार्डात हबिबखा उस्ताद दर्गा असून या दर्ग्यावर नेहमीच स्थानिक व बाहेरून भाविक येऊन पूजा अर्चा करतात अणि दर्ग्यातील दानपेटीत भाविक दान करीत असतात.
दोन दिवसांपूर्वी दर्ग्यातील दानपेटी फोडल्याचे निदर्शनास येताच दर्गा कमेटीने पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दिली होती. त्यानंतर आज, शुक्रवारी त्याच परिसरातील एका अल्पवयीन 17 वर्षीय तरुणावर संशय दर्ग्या कमिटीच्या लोकांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी तात्काळ नेरी येथे येऊन सदर तरुणाला ताब्यात घेतले आणि चोरी बद्दल विचारले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र त्याने कबुलीमध्ये जे कारण चोरीचे सांगितले. ते ऐकूण पोलिस अंचबित झाले.
17 वर्षीय त्या तरुणाला वडिलांनी घराबाहेर काढले म्हणून खाण्या पिण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी पैसे नसल्याने दर्ग्यातील दानपेटीतील पैसे चोरल्याचे त्याने कबूल केले. चोरी केलेल्या 20 हजारातून त्याने 15 हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल विकत घेतला. तर 5 हजार बिअर बार मध्ये खर्च केल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर तरूणावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत