बर्थ डे पार्टीला पैसे न दिल्याने तरुणीची आत्महत्या #suicide


भंडारा:- वाढदिवसाला पार्टी करण्याकरीता वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून तरुणीने घरातील स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि. २२ जुलै सकाळी १० वाजता लाखनी येथे उघडकीस आली. मारिया उर्फ खुशी अहमद सय्यद (वय १९ रा. इंदिरानगर, लाखनी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मारिया सय्यद ही समर्थ महाविद्यालय लाखनी येथे बी. ए. च्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती.
मारियाचा वाढदिवस होता. २१ जुलैच्या रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान तरुणीने तिचे वडील, आई व लहान भाऊ जेवायला घरी बसले असता वाढदिवस असल्याने पैसे पाहिजेत, असे मारियाने सांगितले. तेव्हा सायंकाळी तुझ्याकरिता केक घेऊन येतो, असे वडिलांनी सांगितले. त्यानंतर रात्री सर्वजण झोपी गेले.
२२ जुलै रोजी सकाळी ४.३० वाजता वडील कामावर निघून गेले. लहान भाऊ हा नळ फिटिंगच्या कामाकरिता नागपूरला गेला. आई सकाळी ७.३० वाजता शिकवायला गेली. यावेळी तरुणी घरी एकटीच होती. या एकटेपणातच वडिलांनी वाढदिवसाला पैसे न दिल्याच्या रागात मारिया सय्यद या तरुणाने स्वयंपाक खोलीत गळफास घेतला. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलीस नायक गौरीशंकर कडव करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत