Top News

विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू #death


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील येणाऱ्या विरूर स्टेशन परिसरातील बेरडी या गावात शेतात असलेल्या विद्युत खांबाचा सपोर्टींग ताराला विद्युत प्रवाह होता. या ताराला स्पर्श झाल्याने विजेचा जोराचा धक्का बसला. यात चिचबोडी येथील शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारला घडली. शेख शमसुद्दीन शेख गफर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान घटनेनंतर महावितरण विभागावर संताप व्यक्त करण्यात आला आहे.
मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन व कापसाच्या पिकात ओलावा जास्त असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकरी रोवणीच्या कामी लागले त्यामुळे राजुरा तालुक्यातील येत असलेल्या सोनुर्ली गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिचबोळी येथील शेतकरी शेख शमशुद्दीन गफर यांची शेती बेरडी शेतशिवारात मामा तलावाच्या बाजूला आहे. तेसुद्धा मागील चार दिवसापासून रोवणीच्या बांधण्यात चिखल करून बांद्याचे पारे मारीत असताना त्यांच्या शेतातून विद्युत लाईन जाऊन होती पारे मारीत मारीत विद्युत खांबाच्या जवळ जातात खांबाजवळ बांद्यात समोर ताल पाणीच पाणी असल्यामुळे सपोर्टिंग तारेला करंट येऊन "हे त्यांना मुळीच कल्पना नव्हती " जसा तारेला स्पर्श होताच त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती चिंचबोळी येथील पोलीस पाटील यांनी विरूर पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी कनिष्ठ अभियंता रोहित मकासरे यांच्या समक्ष घटनास्थळाचा पंचनामा करून मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी राजुरा येथे पाठविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार माणिक वाग्धकर, भुजंगराव कुरसंगे, अशोक मडावी हे करीत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने